विश्रामबाग आरक्षणााबाबत आज जनसुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:01+5:302021-02-05T07:30:01+5:30
महापालिकेत वर्षानुवर्षे आरक्षित भूखंडांचा बाजार सुरू आहे. विश्रामबाग येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठविण्याचा निर्णय प्रशासन आणि शासनपातळीवर घेण्यात आला आहे. ...

विश्रामबाग आरक्षणााबाबत आज जनसुनावणी
महापालिकेत वर्षानुवर्षे आरक्षित भूखंडांचा बाजार सुरू आहे. विश्रामबाग येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठविण्याचा निर्णय प्रशासन आणि शासनपातळीवर घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात महापालिका पातळीवर निर्णयाची गरज आहे. त्यासाठी आयुक्तांनी हरकती-सूचना मागविल्या होत्या. हरकती-सूचनांसह तो प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. परंतु हे आरक्षण उठविण्यास सर्वपक्षीय कृती समितीने विरोध केला आहे. तसेच सावरकर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, पालक, विद्यार्थ्यांनीही मोर्चा, आंदोलने केली आहेत. खुद्द उपमहापौर, विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नगरसेवक, पक्ष, संघटनांनी त्यासंदर्भात हरकती घेतल्या. आमदार सुधीर गाडगीळ यांनीही आरक्षण उठविण्यास विरोधाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, यासंदर्भात आयुक्तांनी सुनावणी घेऊन महासभेसमोर निर्णयासाठी ठेवण्याची मागणी केली होती. अखेर यासंदर्भात कापडणीस यांनी सुनावणीचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात सोमवारी दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे.