भिलवडीत गणेशमूर्ती विसर्जनाबाबत प्रबाेधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:14+5:302021-09-11T04:26:14+5:30
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने ‘गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करा’ हा उपक्रम याहीवर्षी राबविण्यात ...

भिलवडीत गणेशमूर्ती विसर्जनाबाबत प्रबाेधन
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील पूज्य साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने ‘गणेशमूर्तींचे घरीच विसर्जन करा’ हा उपक्रम याहीवर्षी राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिली.
साने गुरुजी संस्कार केंद्राच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. त्यास भिलवडीसह परिसरातील गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश भक्तांनी नदी, तलाव, विहीर यामध्ये घरगुती श्रींच्या मूर्तींचे विसर्जन न करता आपल्या घराच्या अंगणात करावे, उत्सवाच्या निमित्ताने होणारे जलप्रदूषण टाळावे. हा या उपक्रमाचा हेतू आहे. जे भक्त या उपक्रमात सहभागी होतील, त्यांना संस्कार केंद्राच्यावतीने ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांनी आपली नावे सार्वजनिक वाचनालय, भिलवडी व साने गुरुजी संस्कार केंद्र येथे नोंद करावीत. एका विशेष समारंभात सहभागी गणेशभक्तांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात येणार आहे. संस्कार केंद्राच्यावतीने गेली अठरा वर्षे गणेश विसर्जनावेळी भिलवडी कृष्णा घाटावर निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. या पर्यावरणपूरक गणेश उत्सव उपक्रमात जास्तीत-जास्त गणेशभक्तांनी सहभाग नोंदवून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन कवडे यांनी केले आहे.