भारत संस्थेच्या वतीने नरसिंहगावला साहित्य प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:27 IST2021-05-26T04:27:49+5:302021-05-26T04:27:49+5:30
कवठेमहांकाळ : नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये शासनमान्य डेडिकेटेड कोविड सेंटरला कुची येथील भारत ...

भारत संस्थेच्या वतीने नरसिंहगावला साहित्य प्रदान
कवठेमहांकाळ :
नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये शासनमान्य डेडिकेटेड कोविड सेंटरला कुची येथील भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने साहित्य प्रदान करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भारत पाटील म्हणाले की, तालुक्यातील सर्वच कोविड योद्ध्यांपर्यंत हे साहित्य पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार बी. जे. गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश गडदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे, नूतन कॉलेजचे डॉ. रामलिंग माळी, सेंटरचे संचालक मोहन माळी, डॉ. ऋतुजा माळी, डॉ. संदीप पाटील, भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष भारत पाटील, गिरीश कोठावळे उपस्थित होते.