मिरज सिव्हीलला इंजेक्शन प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:19+5:302021-05-30T04:22:19+5:30
मिरज : मिरजेतील बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन यांनी मिरज सिव्हील हॉस्पिटलला कोरोना रुग्णांसाठी लागणारी व सध्या तुटवडा असलेली एक ...

मिरज सिव्हीलला इंजेक्शन प्रदान
मिरज : मिरजेतील बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन यांनी मिरज सिव्हील हॉस्पिटलला कोरोना रुग्णांसाठी लागणारी व सध्या तुटवडा असलेली एक हजार इंजेक्शन प्रदान केली.
सध्या सिव्हील रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तुटवडा असलेली इंजेक्शन काही फार्मा कंपनी वितरकांकडून उपलब्ध करुन रुग्णालयाला देण्यात आली. यावेळी डॉ. रुपेश शिंदे, डॉ. एस. के. चौगुले, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, इरावती पटवर्धन, क्रीडाईचे अध्यक्ष रवी खिलारे, ओमकार शुक्ल, आदी उपस्थित होते.
कोविड केंद्राला पंखे प्रदान
मिरज : वड्डी (ता. मिरज) येथे कोविड केंद्राला भाजप युवा मोर्चाचे उमेश हारगे यांच्याकडून पंखे देण्यात आले. यावेळी उमेश हारगे, ईश्वर जनवाडे, कल्लापा नाईक, संदीप अण्णा फडतरे, संदीप कबाडे, मधुकर सन्नके उपस्थित होते.