कासेगाव शिक्षण पतसंस्थेच्या वारसांना धनादेश प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:33+5:302021-06-10T04:18:33+5:30
कासेगाव येथे कासेगाव शिक्षण सेवक पतसंस्थेच्या वतीने श्रीमती प्रियांका खोत यांना मदतीचा धनादेश प्रदान करताना प्राचार्य आर. डी. सावंत, ...

कासेगाव शिक्षण पतसंस्थेच्या वारसांना धनादेश प्रदान
कासेगाव येथे कासेगाव शिक्षण सेवक पतसंस्थेच्या वतीने श्रीमती प्रियांका खोत यांना मदतीचा धनादेश प्रदान करताना प्राचार्य आर. डी. सावंत, प्रा. कृष्णा मंडले, सुभाष आडके व अन्य.
लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : कासेगाव शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेकडून मृत सभासदांच्या वारसांना भरीव आर्थिक मदतीचा धनादेश कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. कृष्णा मंडले व संस्थेचे सदस्य सुभाष आडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आझाद विद्यालय कासेगाव येथे एच.एस.सी. व्होकेशनल विभागाकडे कार्यरत असणारे नितीन रघुनाथ खोत यांचे अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले होते. त्यांच्या पत्नी प्रियांका खोत व मुलगा प्रणित यांना पतसंस्थेकडून ५ लाख १५ हजार ९०० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी प्राचार्य सावंत म्हणाले, सभासदांच्या अचानक जाण्याने त्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी त्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे काम पतसंस्था सभासद मयत फंडाच्या माध्यमातून करीत असते. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त आहे.
यावेळी संस्थेचे सदस्य सुभाष आडके, उद्योजक प्रताप पाटील, पतसंस्थेचे सचिव संजय सुतार, संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.