नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST2021-03-16T04:27:40+5:302021-03-16T04:27:40+5:30
फोटो ओळ : कडेगाव येथे तहसीलदार शैलजा पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संदेश जाधव, सोमनाथ पवार, ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या
फोटो ओळ : कडेगाव येथे तहसीलदार शैलजा पाटील यांना राष्ट्रवादीतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संदेश जाधव, सोमनाथ पवार, निखिल जाधव राहुल जाधव, रज्जाक मुलाणी, राजाराम तांदळे उपस्थित होते.
कडेगाव :
ऑगस्ट व सप्टेंबर २०२० च्या कालावधीत कडेगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले होते. यावेळी शासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार अन्य
अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांना मदत उपलब्ध झाली आहे. या मदत निधीचे वाटप
कडेगाव तालुक्यातील १९ गावांना झाले आहे. मात्र उर्वरित गावांमधील
काही शेतकरी मात्र यापासून वंचित आहेत. त्यांना तातडीने मदत मिळावी असे निवेदन कडेगाव तालुका राष्ट्रवादी सोशल मीडियाचे अध्यक्ष संदेश जाधव यांच्यासह
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी दिली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर पिके अतिवृष्टीने मोडून पडली. याबाबत शासनाने दखल घेऊन मदत निधी उपलब्ध केला. परिसरातील शेतकऱ्यांना पंचनाम्यानुसार रक्कम मंजूर केली आहे. तरी या मदतीच्या रकमेचे आपल्या तालुक्यात काही गावांमधील शेतकऱ्यांना वाटप झाले नाही.
याबाबत आपण लवकरात लवकर कार्यवाही करून मंजूर झालेली रक्कम उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी व अशी मागणी केली आहे.
यावेळी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सोमनाथ पवार, निखिल जाधव, संदेश जाधव, राहुल जाधव, रज्जाक मुलाणी, राजाराम तांदळे उपस्थित होते.