नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोई देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:44+5:302021-03-13T04:48:44+5:30

फोटो ओळी : सागाव (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नूतन इमारतीच्या जागेची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. ...

Provide better health facilities to the citizens | नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोई देणार

नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोई देणार

फोटो ओळी : सागाव (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नूतन इमारतीच्या जागेची पाहणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : कोरोना महामारीने आरोग्याचे व आरोग्य सुविधेचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे शिराळा मतदारसंघातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोई, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

सागाव (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नूतन इमारतीच्या जागेची पाहणी वेळी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, सागावला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नूतन इमारत मंजूर झाली आहे. जुन्या इमारतीचे निर्लेखन होऊन त्याजागी प्रशस्त नवी इमारत उभी राहणार आहे. त्याच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होईल. त्या जागेची आज पाहणी करून आवश्यक मार्गदर्शक सूचनाही केल्या. बिळाशी प्राथमिक आरोग्य केंद्राची देखणी इमारत उभा राहिली आहे. येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी चार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे या विभागातील नागरिकांच्या आरोग्य सेवा सक्षम होतील व कमी खर्चात आरोग्याच्या प्राथमिक स्तरावरील शासकीय सेवा उपलब्ध होतील.

यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, ‘विश्वास’चे संचालक मानसिंग पाटील, सरपंच तात्यासो पाटील, उपसरपंच सत्यजित पाटील, डॉ. डी. बी. निर्मळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Provide better health facilities to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.