मांगले आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:03+5:302021-04-04T04:27:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषद यांच्यावतीने मांगले (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ...

मांगले आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषद यांच्यावतीने मांगले (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्विनी नाईक यांच्या हस्ते पार पडला.
मांगले प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या पंचक्रोशीतील गावांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. रुग्णवाहिका मिळाल्याने मांगले पंचक्रोशीतील रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याचे अश्विनी नाईक यांनी सांगितले.
यावेळी सरपंच मिना बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, मांगले प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी नरेंद्र घड्याळे, जयसिंगराव पवार, राहुल पवार, संतोष उत्तरकर, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.