आटपाडी तालुक्यामध्ये १००० खाटांची साेय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:16+5:302021-05-01T04:25:16+5:30
निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीने आटपाडी तालुक्यात उच्छांद मांडला आहे. तालुक्यातील आटपाडी, शेटफळे, दिघंची, करगणी, नेलकरंजी, खरसुंडी, झरे ...

आटपाडी तालुक्यामध्ये १००० खाटांची साेय करा
निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीने आटपाडी तालुक्यात उच्छांद मांडला आहे. तालुक्यातील आटपाडी, शेटफळे, दिघंची, करगणी, नेलकरंजी, खरसुंडी, झरे येथे कोविड सेंटर तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. आटपाडी येथे गंभीर रुग्णांसाठी २०० खाटांचे, मध्यम लक्षणांच्या रुग्णांसाठी २०० खाटांचे असे एकूण ४०० खाटांचे कोविड सेंटर तातडीने सुरू करावे. दिघंची, शेटफळे, करगणी, नेलकरंजी, खरसुंडी, झरे येथे गंभीर रुग्णासाठी प्रत्येकी २५ खाटांचे, तर मध्यम लक्षणांच्या रुग्णांसाठी प्रत्येकी ७५ खाटांचे असे एकूण प्रत्येकी १०० खाटांचे कोविड सेंटर सुरू करावे. तालुक्यात ७ ठिकाणी गंभीर रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरयुक्त ३५० खाटांची आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांसाठी ६५० खाटांची अशी एकूण एक हजार खाटांच्या विविध कोविड सेंटरची आवश्यकता आहे. तसेच दरराेज १२० रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असून, त्यापैकी केवळ २० इंजेक्शन उपलब्ध होत आहेत.
आनंदराव पाटील, सादिक खाटीक, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी अष्टेकर-कासार, जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील, कार्यकारिणी सदस्या सुजाता टिंगरे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे, राजेंद्र सावंत या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन पाठविले. तसेच नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांना भेटून निवेदनाची प्रत दिली.