आयसेरा कंपनीच्या संशोधनाबाबत अभिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:30+5:302021-04-01T04:27:30+5:30
शिराळा : शिराळासारख्या ग्रामीण व डोंगरी विभागात आयसेरा बायोलॉजीकल कंपनीने कोरोनावर शोधलेली लस ही अभिमानाची गोष्ट आहे ही लस ...

आयसेरा कंपनीच्या संशोधनाबाबत अभिमान
शिराळा : शिराळासारख्या ग्रामीण व डोंगरी विभागात आयसेरा बायोलॉजीकल कंपनीने कोरोनावर शोधलेली लस ही अभिमानाची गोष्ट आहे ही लस वापरासाठी केंद्राची परवानगी लवकर मिळावी असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
येथील औद्योगिक वसाहतीमधील आयसेरा बायोलॉजिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कोरोनावरील प्लास्मा थेरपी (अँटिकोविड सिरम) यशस्वी केली आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी बुधवारी आमदार मानसिंगराव नाईक यांनी ‘आयसेरा’ कंपनीला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
संचालक नंदकुमार कदम यांनी
घोड्याच्या रक्तामध्येही प्रतिपिंडे तयार करून ती रुग्णास दिल्यास तो हमखास बरा होईल याचा अभ्यास करून ‘अँटिकोविड सिरम’ नावाखाली कोरोनाची लस बनविली आहे. ही लस सरकारकडून परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. लस उपलब्ध झाल्यास अनेक कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचतील, अशी माहिती त्यांनी दिली.
‘आयसेरा’ने सिरम इन्स्टिट्यूट, प्रीमियम सिरम यांच्या संयोगाने ही लस बनविली आहे. नवीन कोरोनाच्या स्ट्रेनवर ही लस प्रभावी ठरेल याची खात्री या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी आमदार नाईक यांना दिली.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, आयसेराचे संचालक दिलीप कुलकर्णी, प्रतापराव देशमुख, नंदकुमार कदम, धैर्यशील यादव, रायसिंग शिंदे, विनायक शिंदे, विकास शहा, दिनेश हसबनीस आदी उपस्थित होते.