विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सांगलीत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:26 IST2021-04-01T04:26:49+5:302021-04-01T04:26:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बेरोजगारी व इंधन दरवाढीविरोधात शासनाचा निषेध व्यक्त करीत बुधवारी सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ...

विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सांगलीत निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बेरोजगारी व इंधन दरवाढीविरोधात शासनाचा निषेध व्यक्त करीत बुधवारी सांगली जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गाढवांच्या पाठीवर केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक लावून आंदोलन करण्यात आले.
सांगलीतील काँग्रेस भवनासमोर हे आंदोलन करण्यात आले. ‘कहाँ गये अच्छे दिन, आ गए बुरे दिन’, ‘वा रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल’, ‘रोजगारीच्या नावे बेरोजगारी देणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते जितेश कदम यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
यावेळी जितेश कदम म्हणाले की, देशात भाजप सरकार आल्यापासून बेरोजगारी वाढ आहे. निवडणुकांच्या काळात त्यांनी रोजगार निर्मितीचे आश्वासन देऊनही तरुणांना बेरोजगारीची भेट दिली. इंधन, गॅस दरवाढीतून त्यांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आंदोलनातून आम्ही त्यांच्या या धोरणांचा निषेध करीत आहोत.
यावेळी शहराध्यक्ष सौरभ साळुंखे, उत्कर्ष खाडे, प्रसाद पाटील, श्रेयश मोहिते, योगेश राणे, ओंकार पाटील, प्रसाद पाटील, विनायक मेंढे, आदर्श मोरे, कृष्णत देशमुख, अक्षय सावंत, सूरज काबाडगे, विशाल पोळ, आकाश पोळ, साहिल शेख, अजय माने आदी उपस्थित होते.