शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात लाटणे घेतले हाती, सांगलीत मोर्चा

By संतोष भिसे | Updated: December 18, 2023 19:27 IST

सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सोमवारीही सुरूच राहिले. मानधनवाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेविका व मदतनिसांनी आज जिल्हा परिषदेवर लाटणे ...

सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सोमवारीही सुरूच राहिले. मानधनवाढीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सेविका व मदतनिसांनी आज जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा काढला. त्यांची मुलेही आंदोलनात सहभागी झाली. आमच्या आईचे मानधन वाढवा, अशी हाक देत मुलांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. आज लाटणे मोर्चा काढत त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. घेतल्याशिवाय राहत नाही म्हणत आवाज बुलंद केला.सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता द्या, त्यांच्याप्रमाणे वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्या, सेविकांना दरमहा २६ हजार आणि मदतनिसांना २० हजार रुपये मानधन द्या, महागाई निर्देशांकानुसार प्रत्येक सहा महिन्यांनी मानधनात वाढ करावी, महापालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी पाच ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करा, नवा मोबाइल द्यावा, मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करावे, प्राथमिक शाळांप्रमाणे रजा, सुट्ट्या द्याव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू आहे.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा आनंदी भोसले, जिल्हा कार्याध्यक्षा विजया जाधव, अलका माने, मधुमती मोरे, राणी जाधव आदी करीत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन