महागाईच्या विरोधात मिरजेत राष्ट्रवादीकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:26 IST2021-05-19T04:26:37+5:302021-05-19T04:26:37+5:30
मिरज : देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. यातच केंद्र शासनाने रासायनिक खते, पेट्रोल, ...

महागाईच्या विरोधात मिरजेत राष्ट्रवादीकडून निषेध
मिरज : देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. यातच केंद्र शासनाने रासायनिक खते, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळी यांच्या किमती वाढविलेल्या आहेत. या महागाईच्या निषेधार्थ सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखालील प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना महागाई कमी करण्याबाबत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल, तसेच स्वयंपाकाचा गॅस या दरामध्ये प्रचंड मोठी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे खाद्यतेल व डाळी यांच्याही किमती गगनाला भिडल्या असल्यामुळे सर्वसामान्य जनता केंद्र शासनाच्या महागाईने होरपळून निघाली आहे. नुकत्याच रासायनिक खतांच्या किमती एक ते दीड हजारापर्यंत वाढल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
या वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला-भगिनी सर्वजण त्रस्त आहेत. तरी सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची मागणी केंद्र शासनापर्यंत पोहोचवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी युवानेते शालिवाहन शिंदे-म्हैसाळकर, बाळासाहेब होनमोरे, राष्ट्रवादीचे मिरज तालुकाध्यक्ष तानाजी दळवी, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक, मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद इनामदार, कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, संताजी गायकवाड, कलगोंडा पाटील, तुषार पडसलगे, तुषार खांडेकर, बल्लू पुजारी, पृथ्वीराज सावंत, प्रणव पाटील, भाऊसो नरगच्चे, राजू सय्यद, प्रकाश कदम, आदी उपस्थित होते.