इस्लामपुरात महाविकास आघाडी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:36+5:302021-09-16T04:33:36+5:30
ओळ : इस्लामपूर येथे भाजप ओबीसी मोर्चा सेलतर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी संजय हवालदार, प्रवीण परीट, ...

इस्लामपुरात महाविकास आघाडी सरकारचा निषेध
ओळ : इस्लामपूर येथे भाजप ओबीसी मोर्चा सेलतर्फे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी संजय हवालदार, प्रवीण परीट, सुभाष शिंगण, विकास परीट, अक्षय कोळेकर, महादेव करे, स्मिता पवार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, वाशिम, अकोला व नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर केल्याबद्दल शहर भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने बुधवारी निषेध करण्यात आला.
नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसीविरोधी धोरणांमुळे व नाकर्तेपणामुळेच आज ही ओबीसी समाजावर वेळ आली आहे. या ओबीसीविरोधी महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी इस्लामपूर शहर मंडल ओबीसी मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र सहसंपर्क प्रमुख गौरव खेतमर, जिल्हा सरचिटणीस अल्ताफ तहसीलदार, सरचिणीस संजय हवलदार, चिटणीस महादेव करे, माजी नगरसेवक सुभाष शिंगण, शहर संघटन सरचिटणीस प्रवीण परीट, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष विकास परीट, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिताताई पवार, युवा मोर्चा उपाध्यक्ष अक्षय कोळेकर, मुकुंद रासकर, फिरोज मुंडे, जफर खाटिक, रशीद वारुसे, संतोष कबुरे, प्रज्वल रासकर उपस्थित होते.