शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विधानभवनाच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध

By अशोक डोंबाळे | Updated: July 1, 2024 15:48 IST

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून आंदोलन : दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दराची मागणी

सांगली : दुधाला प्रतिलिटर किमान ४० रुपये दर मिळाला पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी सांगलीतील स्टेशन चौकात विधानभवनच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. सरकारविरोधात जोरदार घोषणाही देण्यात येत होत्या.सांगलीत किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, डाॅ. संजय पाटील, नितीन चव्हाण, विजय बचाटे, रियाज जमादार, वर्षा गडचे, उदय पाटील आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.उमेश देशमुख म्हणाले, दूध दराच्या प्रमुख मागणीसाठी राज्यभर दि. २८ जूनपासून दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे आंदोलन सुरू आहे. दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्यात या नाराजीचा उद्रेक आंदोलनांच्या निमित्ताने पुढे येत आहे. उत्स्फूर्तपणे दूध उत्पादकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, उपोषणे, निदर्शने सुरू केली आहेत. सरकारने या सर्व आंदोलनांची दखल घ्यावी व दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती सरकारला करीत आहे. सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

दूध उत्पादकांना लिटरला १५ रुपये तोटाप्रतिलिटर १५ रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालत आहे. दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ४० रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे, अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली.

आंदोलकांच्या मागण्या

  • दीर्घकालीन दूध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता
  • दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा
  • दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे
  • दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करा
  • पशुखाद्य व पशू औषधांचे दर नियंत्रित ठेवावेत
  • खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल, असा लूटमार विरोधी कायदा करा
  • दूध भेसळ रोखावी
  • अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्यात एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करा
  • वजन काट्यातून दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी तालुकानिहाय तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करा
टॅग्स :SangliसांगलीmilkदूधagitationआंदोलनFarmerशेतकरी