कामेरीत महिला राष्ट्रवादीकडून गॅस दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:25 IST2021-05-14T04:25:25+5:302021-05-14T04:25:25+5:30
कामेरी (ता. वाळवा) येथे छाया पाटील यांनी गॅस, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ प्रातिनिधिक स्वरूपात गॅसच्या रिकाम्या सिलिंडरचे स्वागत करून अनोखे ...

कामेरीत महिला राष्ट्रवादीकडून गॅस दरवाढीचा निषेध
कामेरी (ता. वाळवा) येथे छाया पाटील यांनी गॅस, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ प्रातिनिधिक स्वरूपात गॅसच्या रिकाम्या सिलिंडरचे स्वागत करून अनोखे आंदोलन केले. या वेळी अलका पाटील, सुवर्णा इंगवले, अनिता जाधव, उषा पाटील आदी उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शासनाने वारंवार केलेल्या गॅस दरवाढीच्या झळांनी देशातील संसारी महिलांचे हात पोळत आहेत. खर्चाचा मेळ घालणे अवघड होत आहे म्हणून आम्ही महिला रिकाम्या गॅस सिलिंडरचे स्वागत करीत आहोत, अशी बोचरी टीका सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस छाया पाटील यांनी केली.
कामेरी (ता. वाळवा) येथे बाजार चौकात ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान त्या बोलत होत्या. या वेळी छाया पाटील यांनी महिलांसह मोदी सरकारच्या व गॅस, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ प्रातिनिधिक स्वरूपात गॅसच्या रिकाम्या सिलिंडरचे स्वागत करून अनोखे आंदोलन केले.
या वेळी त्यांच्या कामेरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अलका पाटील, सुवर्णा इंगवले, अनिता जाधव, उषा पाटील या महिला उपस्थित होत्या. सध्या कोरोनामुळे गावात कडक लॉकडाऊन असल्यामुळे ठरावीक महिलांच्या उपस्थितीत हे आंदोलन केले.