कवठेमहाकाळला दुचाकी ढकलून इधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:29+5:302021-01-14T04:21:29+5:30
कोरोनाच्या महामारीमुळे जनतेच्या हातात पैसे नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. बँका, खासगी संस्था, पतसंस्था, फायनास वाले वसुलीसाठी अरेरावी ...

कवठेमहाकाळला दुचाकी ढकलून इधन दरवाढीचा निषेध
कोरोनाच्या महामारीमुळे जनतेच्या हातात पैसे नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. बँका, खासगी संस्था, पतसंस्था, फायनास वाले वसुलीसाठी अरेरावी करत आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. जनतेची अशी बिकट अवस्था असताना केंद्र सरकारने जी इंधन दरवाढ केली आहे. ती जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे. ही इंधन दरवाढ सर्वसामान्य जनतेला परवडनारी नाही. त्यामुळे ही दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी.
ही दरवाढ रद्द केली नाही; तर युवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा ही निवेदनाद्वारे दिला आहे.
कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी तहसीलदार कार्यालयापर्यंत ढकलून इंधन दरवाढीचा निषेध केला. यावेळी प्रा. दादासाहेब ढेरे, महेश पाटील, गणेश पाटील, महेश पवार, अमित शिंत्रे, शिवाजी कदम, सौरभ पाटील, अमर शिंदे, विजय पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो-१३ कवठेमहांकाळ१
फोटो ओळ : कवठेमहांकाळ येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इंधन दरवाढ मागे घेण्याच्या मागणीचे निवदेन तहसीलदार बी. जी. गोरे यांना देण्यात आले.