महिला वाहकांना संरक्षण द्या

By Admin | Updated: June 14, 2014 01:35 IST2014-06-14T01:23:47+5:302014-06-14T01:35:36+5:30

कोणतेही कारण नसताना मारहाण

Protect women carriers | महिला वाहकांना संरक्षण द्या

महिला वाहकांना संरक्षण द्या

सांगली : डोंबिवली येथे दीपमाला सोनवणे या महिला वाहकाला कोणतेही कारण नसताना मारहाण झाली होती. या घटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे सांगलीत निषेध करण्यात आला. तसेच महिला वाहकांना गुंडांकडून होणाऱ्या मारहाणीमुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे, विलास यादव यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी बोलताना बिराज साळुंखे म्हणाले की, डोंबिवली येथे दीपमाला सोनवणे या महिला वाहकाला बेदम मारहाण केली. गुंडाकडून मारहाण होत असताना प्रवाशांनी कुणीही सोडविले नाही. चालकाने आणि दुसऱ्या बसच्या महिला वाहकाने मारहाण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या गुडाने चालक व अन्य वाहकालाही मारहाण केली होती. त्यानंतर विटा येथे पूनम मोरे, मिरजेत नंदा जोडके, नेहा पाटील यांनाही मारहाण झालेली आहे. मारहाणीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महिला वाहकांना शासनाने पोलीस संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाचे व्यवस्थापक, पोलीस महासंचालक, जिल्हा पोलीसप्रमुख, विभाग नियंत्रकांना मागणीचे निवेदन दिले आहे.
आंदोलनामध्ये एसटी कर्मचारी नरिला आत्तार, वैशाली जाधव, हेमलता कोकाटे, श्रुती देशपांडे, साधना माने, शमू मुल्ला आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)

Web Title: Protect women carriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.