आगी रोखून पर्यावरणाचे रक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:23+5:302021-02-07T04:24:23+5:30

कामेरी : नैसर्गिक वणवा आपण रोखू शकत नसलो तरी आवश्यक ती दक्षता देऊन मानवनिर्मित व वन्य प्राण्यांच्या हस्तक्षेपामुळे लागणारा ...

Protect the environment by preventing fires | आगी रोखून पर्यावरणाचे रक्षण करा

आगी रोखून पर्यावरणाचे रक्षण करा

कामेरी : नैसर्गिक वणवा आपण रोखू शकत नसलो तरी आवश्यक ती दक्षता देऊन मानवनिर्मित व वन्य प्राण्यांच्या हस्तक्षेपामुळे लागणारा वणवा रोखून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. मल्लिकार्जुन डोंगर परिसरात मानवाच्या हस्तक्षेपामुळे आगी लागण्याच्या घटना घडू नयेत, म्हणून ग्रामस्थांनी दक्षता घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वनरक्षक अमोल साठे यांनी केले.

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शिराळा वन परिक्षेत्राच्यावतीने आयोजन शिबिरात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील व सरपंच डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.

आनंदराव पाटील म्हणाले, मल्लिकार्जुन डोंगर परिसर हा आपल्याला लाभलेले वरदान आहे. आगीमुळे त्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, यासाठी ग्रामस्थांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. यावेळी उपसरपंच विनायक जाधव, वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक अमोल शिंदे, निवास उगळे, भगवान गायकवाड, विजय मदने, शंकर रकटे, मल्लिकार्जुन सेवा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो-०६कामेरी१

फोटो ओळी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे शिराळा वन परिक्षेत्राच्यावतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात वनरक्षक अमोल साठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आनंदराव पाटील, डॉ. सचिन पाटील उपस्थित होते.

Web Title: Protect the environment by preventing fires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.