प्रस्तावित सावळज पोलीस ठाणे मंजूर व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:23 IST2021-04-05T04:23:22+5:302021-04-05T04:23:22+5:30

निवेदनामध्ये म्हटले आहे आहे की, मौजे सावळज दूरक्षेत्र अंतर्गत असणारी गावे ही तासगांव पोलीस ठाण्यापासून दूर असून, येथील नागरिकांना ...

The proposed Savlaj Police Station should be approved | प्रस्तावित सावळज पोलीस ठाणे मंजूर व्हावे

प्रस्तावित सावळज पोलीस ठाणे मंजूर व्हावे

निवेदनामध्ये म्हटले आहे आहे की, मौजे सावळज दूरक्षेत्र अंतर्गत असणारी गावे ही तासगांव पोलीस ठाण्यापासून दूर असून, येथील नागरिकांना ते गैरसोयीचे आणि खर्चीकही ठरते. सावळज ही एक मोठी बाजारपेठ असून, येथे होणाऱ्या आठवडी बाजाराला तुडुंब गर्दी होते. चोऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. व्यापारी वर्गात यामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना सतत होणारी द्राक्ष दलालांची फसवणूक ही गंभीर बाब दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय येथे महाविद्यालये, हायस्कूल, शाळाही असून, आसपासच्या गावांमधून या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. या ठिकाणच्या वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण, कोलमडलेली वाहतूक व्यवस्था आणि इतर बाबींचा विचार करता तासगांव पोलीस प्रशासनावर पडणारा भयंकर ताण हाही दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. तेव्हा, या सर्व बाबींचा विचार करता बरीच वर्षे प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावित सावळज पोलीस ठाण्यास तत्काळ मंजुरी मिळावी.

यावेळी सावळज पोलीस ठाण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असून, त्यास लवकर मंजुरी मिळवू अशी ग्वाही आमदार सुमनताई पाटील यांनी दिली.

याप्रसंगी तालुका युवक अध्यक्ष दत्तात्रय हावळे, राष्ट्रवादी सांगली जिल्हा संघटक दीपक उनउने, डोंगरसोनीचे उपसरपंच किशोर कोडग, सरचिटणीस अजय पाटील, युवक कार्यकारिणी सदस्य संतोष चव्हाण, प्रताप शिंदे, महेश झांबरे व सावळज परिसरातील कार्यकर्तेही उपस्थित होते.

Web Title: The proposed Savlaj Police Station should be approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.