शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: रेल्वेची क्वाडलाईन मालवाहतुकीसाठी, विभागीय व्यवस्थापकानी केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 18:39 IST

मिरज स्थानकावरील ‘मिरज जंक्शन’ फलक येत्या तीन-चार दिवसांत बसवला जाईल

मिरज : मिरजेत कोल्हापूर व सोलापूर रेल्वेमार्ग जोडणारी प्रस्तावित क्वाडलाईन मालवाहतुकीसाठी असल्याने प्रवासी गाड्यांवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे विभागीय व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी स्पष्ट केले.मध्य रेल्वे पुणे विभागीय व्यवस्थापक इंदुमती दुबे यांनी शुक्रवारी मिरज व सांगली स्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी रेल्वे कृती समिती अध्यक्ष  मकरंद देशपांडे, विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, सचिव सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी सेनेचे संदीप शिंदे, राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे  शहराध्यक्ष अभिजित हारगे यांनी त्यांची भेट घेतली.यावेळी दुबे म्हणाल्या की, प्रस्तावित क्वाडलाईनचा वापर प्रामुख्याने मालवाहतूक गाड्यांसाठी आहे.  या क्वाडलाईनचे स्थानक मिरज जंक्शन परिसरात उभारण्यात येईल. मिरज जंक्शन व क्वाडलाईन स्थानक ओव्हरब्रीज व रस्त्याने जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना ते सोयीचे होणार आहे. प्रस्तावित क्वाडलाईनमुळे रेल्वेगाड्या मिरज जंक्शनवर न येता परस्पर बाहेरून जातील या केवळ अफवा आहेत. मिरज स्थानकावरील ‘मिरज जंक्शन’ फलक येत्या तीन-चार दिवसांत बसवला जाईल.स्थानकाबाहेरील रस्ता व पाण्याचा निचरा करणारे ड्रेनेज व गटारीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. क्वाडलाईनमुळे मिरजेपासून लांब अंतरावर स्थानक उभारण्यात येणार असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.मिरज रेल्वे जंक्शन बचाव कृती समितीचे ॲड. ए. ए. काझी, जहीर मुजावर, अक्षय वाघमारे, राकेश तामगावे, इंद्रजित घाटे, शकील पीरजादे यांनीही दुबे यांची भेट घेऊन  क्वाडलाईनबाबत  भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर मिरज जंक्शनचे महत्व कमी करणारा कोणताही निर्णय रेल्वे प्रशासन घेणार नसल्याची ग्वाही विभागीय व्यवस्थापक श्रीमती दुबे यांनी शिष्टमंडळाला दिली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजrailwayरेल्वे