ख्रिश्चन दफनभूमीसाठी भूसंपादनाचा प्रस्ताव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:23 IST2021-02-08T04:23:46+5:302021-02-08T04:23:46+5:30

सांगली : शहरातील ख्रिश्चन समाजाच्या दफभूमीसाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत आवश्यक निधी दिला जाईल. या दफनभूमीसाठी आरक्षित जागा संपादन करण्याचा ...

Propose land acquisition for a Christian cemetery | ख्रिश्चन दफनभूमीसाठी भूसंपादनाचा प्रस्ताव द्या

ख्रिश्चन दफनभूमीसाठी भूसंपादनाचा प्रस्ताव द्या

सांगली : शहरातील ख्रिश्चन समाजाच्या दफभूमीसाठी शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत आवश्यक निधी दिला जाईल. या दफनभूमीसाठी आरक्षित जागा संपादन करण्याचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले.

येथील बेथसदा प्रार्थना केंद्राचे अध्यक्ष रेव्हरंट अशोक लोंढे यांच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन धर्मगुरू व नागरिकांनी राज्यमंत्री कदम यांना निवेदन दिले. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, युवा नेते जितेश कदम, मदनभाऊ युवा मंचचे कार्याध्यक्ष शीतल लोंढे, सतीश घाटगे, जालिंदर आवळे, सॅमसन इम्मानुएल, देवदान पांढरे, विजय वायदंडे, अनिल सातपुते, सुहास फाळके, बेंजामिन घाडगे आदी उपस्थित होते.

लोंढे म्हणाले, तत्कालीन सांगली नगरपालिकेने ख्रिश्चन समाजाला दफनभूमीसाठी दिलेली जागा आता संपली आहे. त्यामुळे येथे पूर्वी दफन झालेल्या जागेवरच आता नवीन मृतदेह दफन करावे लागत आहे. श्यामरावनगर येथील सर्व्हे नंबर ५०७ मधील सहा एकर जागा दफनभूमीसाठी आरक्षित आहे. यातील दीड एकर जागा ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीला देण्याचा ठराव महापालिकेने केला. मात्र ही जागा भूसंपादन करण्यात अडथळे येत आहे. महापालिकेकडे निधी नसल्याने भूसंपादन रखडले आहे. यासाठी शासनाने अल्पसंख्याक विभागातून महापालिकेला निधी द्यावा. जयश्रीताई पाटील यांनीही ख्रिश्चन समाजाचा दफनभूमीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.

मंत्री कदम यांनी शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्याशी चर्चा करून भूसंपादनाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी राधेशाम, सुनील तुपदळे, जॉन्सन मोरे, सतीश कोल्हे, आशिष होळकर, पोपट मोरे, दिलीप माळी, सूर्यकांत लोंढे, दिलीप भोरे, किशोर सपकाळ, संभाजी सदाकळे, तिमथी मोरे, तानाजी पाटोळे, सचिन केंचे, निखील लोंढे, सुनील मोरे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : सांगली शहरातील ख्रिश्चन दफनभूमीप्रश्नी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रेव्ह अशोक लोंढे, जयश्रीताई पाटील, सतीश घाटगे, जालिंदर आवळे, सॅमसन इमानुएल, देवदान पांढरे आदी उपस्थित होते.

Web Title: Propose land acquisition for a Christian cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.