शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: टिपेश्वर अभयारण्यातून चांदोलीत येणार पाहुणा, सह्याद्रीत वाघाच्या स्थलांतराचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:59 IST

ताडोबातून स्थलांतरासाठीही मंजुरी

सांगली : यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी परिसरात आलेला वाघ सह्याद्री खोऱ्यात सोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास तो चांदोली अभयारण्य किंवा कोयनेच्या जंगलपट्ट्यात सोडला जाऊ शकतो.सध्या सह्याद्रीच्या खोऱ्यात स्थलांतरित वाघांचा वावर आहे. वन विभागाच्या कॅमेऱ्यांत अधूनमधून चित्रीत होणारे वाघ राधानगरीपासून गोव्यापर्यंतच्या टापूत फिरताना आढळले आहेत. सध्या कोयना किंवा चांदोलीमध्येच कायमस्वरूपी अधिवास असणारा वाघ नाही. बार्शी परिसरातील वाघ येथे आल्यास अधिवास निश्चितीसाठी संघर्ष उद्भवणार हे निश्चित आहे.गेल्या महिन्यात यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून एक वाघ बार्शी परिसरात आला आहे. त्याने सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास केला असून धाराशिवमार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. बार्शी ते धाराशिव या टापूत त्याचा वावर असल्याचे वन विभागाला आढळले आहे. या वाघाला जेरबंद करून रेडिओ कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याचा वन विभागाचा विचार आहे. तसा प्रस्ताव सोलापूर विभागाने शासनाकडे पाठविला आहे.

या वाघामुळे बार्शी तालुक्यातील १४ गावांत घबराटीचे वातावरण आहे. काही जनावरांवर त्याने हल्लेही केले आहेत. त्यामुळे त्याला पकडण्याचा वन विभागाचा प्रस्ताव आहे. त्याला सह्याद्री खोऱ्यात सोडण्याचा प्रस्ताव वन विभागाच्या पुणे कार्यालयाकडे गेला असून तेथे मंजुरी मिळाल्यास मुंबईला पुढील मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. अंतिम निर्णय नागपूरमध्ये होईल.वन विभागाच्या अगदी अलीकडील निरीक्षणानुसार सह्याद्री खोऱ्यात सध्या एसटीआर - टी १ या वाघाचे वास्तव्य आहे. चांदोली वन्यजीव विभागात १७ डिसेंबर २०२३ रोजी तो पहिल्यांदाच दिसला होता. त्यानंतर सलग वर्षभर त्याच्यावर नजर ठेवण्यात आली. या कालावधीत तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातच वास्तव्यास असल्याचे आढळले आहे. बार्शी परिसरातील वाघ येथे सोडल्यास अधिवासासाठी संघर्ष उद्भवणार आहे.

ताडोबातूनही वाघ येणारवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून काही वाघांच्या जोड्यांचे सह्याद्री खोऱ्यात पुनर्वसन करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यानुसार लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे. यानिमित्ताने सह्याद्रीत वाघांची डरकाळी पुन्हा घुमणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीTigerवाघforestजंगल