जत तालुक्यात सात नव्या ग्रामपंचायतीसाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:16+5:302021-06-21T04:18:16+5:30
जत : जत तालुक्यात सात नव्या ग्रामपंचायतींसाठी नव्याने प्रस्ताव करण्यासाठी आमदार विक्रम सावंत यांनी महसूल विभागाला आदेश दिले आहेत. ...

जत तालुक्यात सात नव्या ग्रामपंचायतीसाठी प्रस्ताव
जत : जत तालुक्यात सात नव्या ग्रामपंचायतींसाठी नव्याने प्रस्ताव करण्यासाठी आमदार विक्रम सावंत यांनी महसूल विभागाला आदेश दिले आहेत. तातडीने शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन त्यांनी तलाठी व ग्रामसेवकांना केले आहे.
जत तालुक्यातील जिरम्याळ ग्रामपंचायत हद्दीतील शेळकेवाडी, रामपूर ग्रामपंचायत हद्दीतील मल्लाळ, सनमडी ग्रामपंचायत हद्दीतील मायथळ, व्हसपेठ ग्रामपंचायत हद्दीतील राजोबाचीबाडी, उमदी ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठलवाडी तर पांडोझरी ग्रामपंचायत हद्दीतील पारधीवस्ती तर पाच्छापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालेकिरी अशा सात गावांच्या नव्याने ग्रामपंचायतीची निर्मिती होऊ शकते.
विशेष ग्रामसभा घेऊन तसे ठराव करावेत. शिवाय नव्याने ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठीचे प्रस्ताव ग्रामसेवक, तलाठी यांनी द्यावेत, असे आदेश दिले आहेत. विकासाच्या व इतर सोयी-सुविधांच्या दृष्टीने स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्या तर योग्य आहे. त्यामुळे तालुक्यातील नव्याने सात ग्रामपंचायती स्थापन होऊ शकतात. सध्या जत तालुक्यात १२४ महसुली गावे आहेत. त्यात आणखी सात गावांची भर पडल्यास १३१ महसुली गावे होतात.