शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील पूर्व भागातील ६५ गावांसाठीच्या सुधारित म्हैसाळ योजनेचा प्रस्ताव सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:07 IST

६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार

सांगली : जत तालुक्यातील पूर्व भागातील ६५ गावांसाठीच्या सुधारित म्हैसाळ योजनेच्या एक हजार ९२८ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव सांगली जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पुणे येथील कृष्णा खोरे महामंडळ कार्यालयाकडे सादर केला आहे. या कार्यालयाकडून बुधवारी राज्य शासनाकडे प्रस्तावाचे सादरीकरण होणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी योजनेला मंजुरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.जत पूर्व भागातील कायम दुष्काळी ६५ गावांतील नागरिकांनी पाणी मिळावे, यासाठी आंदोलन सुरू केले होते. काही गावांनी कर्नाटक राज्यात जाण्याचा ठरावही केला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने तातडीने सुधारित म्हैसाळ योजनेचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना नावाने प्रस्तावित योजनेसाठी मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन म्हणजे बेडग (ता. मिरज) येथून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी सहा टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. त्यातून ६५ गावांतील ५० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेला एक हजार ९२८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या पद्धतीचा प्रस्ताव सांगली जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार करून तो कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे मंगळवारी सादर केला आहे. बुधवारी हा प्रस्ताव कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले हे राज्य शासनाकडे सादर करणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीjat-acजाटWaterपाणी