प्रभाग १६ च्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाकडे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:00+5:302020-12-05T05:07:00+5:30
सांगली : काँग्रेसचे माजी महापौर, नगरसेवक हारुण शिकलगार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये पोटनिवडणूक घेण्यासाठी महापालिकेने ...

प्रभाग १६ च्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाकडे प्रस्ताव
सांगली : काँग्रेसचे माजी महापौर, नगरसेवक हारुण शिकलगार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये पोटनिवडणूक घेण्यासाठी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव दाखल केला आहे. आयोगाकडूनही निवडणुकीबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रभागाची लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १६ अ हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे हारुण शिकलगार विजयी झाले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले. या रिक्त जागेच्या निवडणुकीसाठी महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर केला होता. यावर आयोगाकडून नुकतेच पालिकेला पत्र आले असून, या प्रभागाची माहिती मागवण्यात आली आहे. कोल्हापूरसह राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यावेळीच या प्रभागाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत शिकलगार यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचे संकेत काँग्रेस नेत्यांनी दिले आहेत. तसेच निवडणूक बिनविरोध करण्याचेही आवाहन केले आहे. पण सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे ठरणार आहे.
चौकट
राजेश नाईक यांना भाजपची ऑफर
प्रभाग १६ मध्ये दोन काँग्रेस व दोन भाजपचे सदस्य आहेत. हारुण शिकलगार यांच्या निधनाने काँग्रेसची एक जागा रिक्त झाली आहे. भाजपने संख्याबळ वाढविण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी काँग्रेसचे बंडखोर माजी नगरसेवक राजेश नाईक यांना भाजपने ऑफर दिली असल्याचे समजते.