कुपवाडला १४३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:17+5:302021-09-11T04:27:17+5:30

कुपवाड : शहरासह विस्तारित परिसरातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या १४३ गुन्हेगारांवर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई ...

Prohibitive action against 143 criminals in Kupwad | कुपवाडला १४३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कुपवाडला १४३ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कुपवाड : शहरासह विस्तारित परिसरातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या १४३ गुन्हेगारांवर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कुपवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी पत्रकारांना दिली.

गणेशोत्सव, नवरात्र या कालावधीत कुपवाड पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडणार नाही, तसेच गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना कुपवाड पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार कुपवाड पोलिसांनी कारवाई केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही गुन्हेगाराने व नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्याचे दिसून आल्यास किंवा शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणार आहे.

Web Title: Prohibitive action against 143 criminals in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.