वारणा पतसंस्थेला साडेआठ लाखांचा नफा : रोहित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:39+5:302021-04-25T04:26:39+5:30
कुरळप : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा ग्रामविकास सहकारी पतसंस्थेने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पाच कोटी २३ ...

वारणा पतसंस्थेला साडेआठ लाखांचा नफा : रोहित पाटील
कुरळप : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा ग्रामविकास सहकारी पतसंस्थेने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात पाच कोटी २३ लाख रुपयांचे कर्ज वाटप आले आहे. संस्थेला आर्थिक वर्षात आठ लाख ५० हजार रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, वारणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाजीराव पाटील यांच्या प्रेरणेने व वारणा विविध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतवडे खुर्दमध्ये वारणा ग्रामविकास सहकारी पतसंस्थेची तसेच दूध संस्था, सोसायटी, शिक्षण संस्था यांची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. या कामी वारणा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आनंदराव पाटील यांचेही मार्गदर्शन लाभले आहेत. आगामी काळात सर्वच संस्थांचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे करून संस्था सभासद, ठेवीदार व कर्जदार यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे.
संस्थेच्या वाटचालीत संचालक मंडळ आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. कोरोना संसर्गाची स्थिती असतानाही संस्थेने उत्तम वसुली केली आहे. सर्व तरतुदी वजा जाता संस्थेला ८ लाख ५० हजार इतका निव्वळ नफा झाला आहे. संस्थेने ९५ टक्के कर्ज वसुली केली आहे. संस्थेचे भागभांडवल व स्वनिधी २ कोटी ३२ लाख रुपये इतका आहे. संस्थेकडे ६ कोटी ३६ लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत.