कवठेमहांकाळ तालुक्यात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:41+5:302021-02-06T04:49:41+5:30
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावागावांत अतिक्रमणने विळखा घातला आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. तालुक्यातील अनेक गावांत अशी ...

कवठेमहांकाळ तालुक्यात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावागावांत अतिक्रमणने विळखा घातला आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. तालुक्यातील अनेक गावांत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कवठेमहांकाळ सार्वजनिक बांधकाम विभागाने कुकटोळी, देशिंग, खरशिंग, आणि ढालगाव या गावांना रस्त्याकडेला असलेल्या दुकान, हॉटेल, टपरी, पानपट्टी, घरासमोरील व्हरांडे अशा प्रकारचे अतिक्रमण काढण्यासाठी लेखी नोटीस ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. मात्र अद्याप ग्रामपंचायत असो या सार्वजनिक बांधकाम विभागाने यांकडे दुर्लक्ष केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार ही अतिक्रमणे ग्रामपंचायत हद्दतील आहेत; तर ग्रामपंचायत बांधकाम विभागाकडे बोट करत आहे. यामुळे ही अतिक्रमणे नेमकी कोणाच्या याबाबत संभ्रम आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिक्रमणे विळखा घातला आहे. रांजनी, धुळगाव, कोंगनोळी,मळणगाव यांच्यासह अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला व गावठाण, गायरान हद्दीत अतिक्रमणाचे साम्राज्य वाढले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत तेथील गायरान जागेमध्ये राजकीय लोंकांनी आपली पोळी भाजण्यासाठी १० ते १५ गुंडे जागा राहण्यासाठी दिल्या आहेत, तर राजकीय लोकांनीही स्वतःदेखील त्या ठिकाणी अर्धा-अर्धा एकर जागेवर कब्जा केला आहे. मात्र खरोखरच गरीब असलेल्या लोकांना अद्याप तिथे राहण्यासाठी जागा नाही ते भाड्याने राहत आहेत. याकडेदेखील तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहेत.
कोट
तालुक्यातील देशिंग, खरशिंग, कुकटोळी, ढालगाव या गावांना आम्ही रस्त्याकडचे अतिक्रमण काढायचे वेळोवेळी पत्र दिले असतानादेखील अद्याप ग्रामपंचायत विभागाने पत्राचे उत्तर व अतिक्रमणवर कारवाई केली नाही.
- चंद्रकांत पाटील
उपअभियंता सा. बां. कवठेमहांकाळ
कोट
संबंधित रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग या मालकीचा असून, रस्त्यावरचे अतिक्रमण हे सार्वजनिक बांधकाम विभागानेच काढावे लागेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायत व पंचायत समितीला पत्र देऊन अतिक्रमण काढायला सांगणे हे चुकीचे आहे.
- रवींद्र कणसे
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कवठेमहांकाळ