जयंत वाचनालयाच्यावतीने विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:49+5:302021-01-20T04:26:49+5:30

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जयंत वाचनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण ...

Prize distribution of various competitions on behalf of Jayant Library | जयंत वाचनालयाच्यावतीने विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

जयंत वाचनालयाच्यावतीने विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जयंत वाचनालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रतीक पाटील, देवराज पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच दाजी गावडे, जयंत वाचनालयाचे संस्थापक सचिन पाटील, प्रा. कृष्णा मंडले, शंकर गावडे, आदी उपस्थित होते.

जयंत वाचनालयाने राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये राजस व्याख्यानमाला, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आदींचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राजस व्याख्यानमालेमध्ये प्रा. लता ऐवळे, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. संजय खरात यांनी वेगवेगळे विषय घेऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या व्याख्यानमालेचे उद्घाटन राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, उदय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, तर बक्षीस समारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कासेगाव ग्रामस्थांच्यावतीने सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, फिरोज अत्तार, सुरेश माने, रझाक मुल्ला, डॉ. अरुण शिंदे उपस्थित होते.

फोटो - १९०१२०२१-आयएसएलएम-कासेगाव न्यूज

सांगली जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतीक पाटील यांची निवड झाल्याबदल त्यांचा सत्कार सरपंच किरण पाटील यांनी केला. यावेळी देवराज पाटील, दाजी गावडे उपस्थित होते.

Web Title: Prize distribution of various competitions on behalf of Jayant Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.