शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सांगलीतील मेणी फाट्या जवळ पुलावरुन खासगी बस कोसळली, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 17:15 IST

ही खासगी बस गोव्याहून राजस्थानला निघाली होती. सांगलीतील मेणी फाटा येथे या बसचा अपघात झाला.

कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथे चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस पुलाच्या कठडा आणि लोखंडी पाईप तोडून वीस फूट खोल ओढ्यात कोसळली. यात नऊ जण जखमी झाले. अपघातात बसचे आठ लाखांचे नुकसान झाले. बस गोव्याहून राजस्थानकडे जाताना काल, बुधवारी (दि.८) रात्री ११ नंतर ही घटना घडली. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून कोकरुड पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.या घटनेबाबत ताराचंद रामविलास साहू (रा. पिसागन, जि. अजमेर, राजस्थान) याने फिर्याद दिली आहे. तो आपल्या सहकाऱ्यांसह गोव्यात एक लग्न समारंभास खासगी बसने (आर.जे. ०९ पी.ए. ४१४७) गेला होता. तेथून परत बुधवारी रात्री आंबाघाट, मलकापूरमार्गे कराडकडे जात होता. मेणी (ता. शिराळा) येथे आल्यावर चालक राजुसिंग राजपूत याला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. यामुळे ओढ्यावरील पुलाचा कठडा आणि पाईपला बसची जोरदार धडक बसली. यांनतर बस पलटी होऊन थेट वीस फूट खोल ओढ्यातील पाण्यात कोसळली.यामध्ये ताराचंद साहू, राजुसिंग राजपूत, चंद्रप्रकाश माळी, पिंटू गुज्जर, अशोक प्रजापत, जसराज जाट, गोपाल, कान्हा जाट, राजेंद्र सिंह (सर्व रा. राजस्थान) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बाजार समिती संचालक दिनकर दिंडे यांनी अमीर मोकाशी, रमजान मोकाशी, शाहरुख मोकाशी, संकेत दिंडे यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तीन तास ओढ्यातील पाण्यात उभे राहत मदत कार्य केले. दिनकर दिंडे यांनी वेळेत जेसीबी उपलब्ध केल्याने जखमींना बाहेर काढता आले. वेळेत मदत मिळाल्याने नऊ जणांचे प्राण वाचले. कोकरुड पोलिसांचेही यावेळी सहकार्य मिळाले.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात