पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:27 IST2020-12-31T04:27:03+5:302020-12-31T04:27:03+5:30

पृथ्वीराज पाटील यांनी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, हॉस्पिटल, पतसंस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समाजकार्य सुरूठेवले ...

Prithviraj Patil's birthday simply | पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने

पृथ्वीराज पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने

पृथ्वीराज पाटील यांनी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, हॉस्पिटल, पतसंस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समाजकार्य सुरूठेवले आहे. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले संघटनात्मक काम केले आहे. महापूर असो किंवा कोरोनाचे संकट अशावेळी जनतेच्या मदतीसाठी धावून जाणारे हे नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

संघटनात्मक व सामाजिक पातळीवर त्यांच्या हातून होणाऱ्या कार्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. मात्र कोरोना व अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणताही कार्यक्रम घेण्यास पृथ्वीराज पाटील यांनी नकार दिला आहे. कोरोना काळात आपले जिवाभावाचे कार्यकर्ते व अनेक परिवारातील असंख्य नागरिक आपल्यातून निघून गेले आहेत. अशावेळी वाढदिवस साजरा करणे उचित नाही. त्यामुळे वाढदिवसादिवशी आपण बाहेरगावी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Prithviraj Patil's birthday simply