प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:33 IST2021-09-09T04:33:16+5:302021-09-09T04:33:16+5:30

तासगाव : तासगाव तालुका गुणवंत शिक्षकांची खाण असून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमुळेच तालुक्यातील गुणवत्तेचा आलेख सातत्याने वाढत असलेला दिसून येतो. ...

Priority will be given to solving the problems of primary teachers | प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू

तासगाव : तासगाव तालुका गुणवंत शिक्षकांची खाण असून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमुळेच तालुक्यातील गुणवत्तेचा आलेख सातत्याने वाढत असलेला दिसून येतो. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तासगाव तालुका नेहमी अग्रस्थानी असतो. त्यामुळे तासगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, असे प्रतिपादन तासगाव पंचायत समितीचे नूतन सभापती संभाजी पाटील यांनी केले.

तासगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. लवकरच संबंधित सर्वांची पंचायत समिती स्तरावर बैठक घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव, तासगावचे शिक्षक नेते श्रीकांत पवार, तासगावचे अध्यक्ष शब्बीर तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ थोरात, नगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष रणजित नाटेकर, तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील, विठ्ठल धेंडज, प्रभाकर तिरमारे जयंत नाईक, मालोजी काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Priority will be given to solving the problems of primary teachers