विटा शहराच्या गुणात्मक विकासाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:20 IST2021-06-05T04:20:00+5:302021-06-05T04:20:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : नगरपालिका विटेकर नागरिकांसाठी विविध नागरी सुविधा देण्यात कोणतीही कुचराई करीत नाही. आगामी काळात माजी ...

Priority to the qualitative development of Vita city | विटा शहराच्या गुणात्मक विकासाला प्राधान्य

विटा शहराच्या गुणात्मक विकासाला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : नगरपालिका विटेकर नागरिकांसाठी विविध नागरी सुविधा देण्यात कोणतीही कुचराई करीत नाही. आगामी काळात माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या गतिमान आणि गुणात्मक विकासाला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांनी दिली.

विटा येथील प्रभाग क्र. ३ मधील वासुंबे रोड, हजारे-घोडके मळा ते सावकरनगरमार्गे हणमंतनगर, खानापूर रोड या ५० लाख रुपये खर्चाच्या नवीन रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष सारिका सपकाळ, नगरसेवक किरण तारळेकर, प्रतिभा चोथे, मंगेश हजारे, अविनाश चोथे, अनिल चोथे, रामभाऊ घोडके, जालिंदर कदम, नीलेश म्हेत्रे, विनोद तावरे, ॲड. विकास जाधव, संदीप दाते, रोहन लिपारे, विजय कदम, महेश भोंगाळे, सुहास कलढोणे, संदीप खारगे, मितेश खटावकर, अशोक बोराटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

चौकट

वाहतूक कोंडी दूर होणार

या रस्त्यामुळे जुना वासुंबे रोड व लेंगरे रोड पूर्व बाजूच्या नागरिकांना खानापूर रोड व हणमंतनगरला जाण्यासाठी सोईचा रस्ता उपलब्ध होणार आहे. पर्यायाने लेंगरे रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून खानापूर रोडकडे जाणारी वाहतूक कमी होऊन वाहतूक कोंडी काहीअंशी दूर होणार आहे.

Web Title: Priority to the qualitative development of Vita city