शिराळा उत्तर भागातील विकासकामांना प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:35+5:302021-06-01T04:19:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाटेगाव : आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शिराळा उत्तर ...

शिराळा उत्तर भागातील विकासकामांना प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून व त्यांच्या स्थानिक विकास निधीतून शिराळा उत्तर भागातील सार्वजनिक विकासकामांना प्राधान्य देऊन गावांचा विकास करू, असे प्रतिपादन युवानेते विराज नाईक यांनी केले.
बांबवडे (ता. शिराळा) येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरासमोरील जागेमध्ये पेविंग ब्लॉक बसवण्याचा प्रारंभ विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विराज नाईक यांनी गावातील सार्वजनिक कामाची व गावातील अडीअडचणीची, आरोग्य व कोरोनाविषयी चर्चा करून आढावा घेतला.
यावेळी विश्वास कारखान्याचे संचालक विश्वासराव पाटील, सुकुमार पाटील, पोलीसपाटील धनंजय माने, संजय पाटील, ग्रामसेवक महेश भोई, अजितकुमार पाटील, जयसिंग जाधव, दौलत जाधव, राजाराम हिंगणे, शिवाजी धुमाळ, ऋषिकेश पाटील आदी उपस्थित होते.