शेळकेवाडीत दूध संकलन केंद्रावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:47+5:302021-02-06T04:47:47+5:30
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील शेळकेवाडी येथे सटवाई दूध संकलन केंद्रावर भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून १ ...

शेळकेवाडीत दूध संकलन केंद्रावर छापा
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील शेळकेवाडी येथे सटवाई दूध संकलन केंद्रावर भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून १ लाख रुपये किमतीचा अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.
शेळकेवाडीतील दूध संकलन केंद्रावर भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. पथकाने या केंद्रावर छापा टाकला. भेसळीच्या संशयावरून म्हैस व गाय दूध, रिफाईन्ड सोयाबीन तेल, व्हे पावडर या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेऊन शिल्लक साठा जप्त करण्यात आला. तसेच गाय व म्हैस दुधाचा साठा नष्ट करण्यात आला. अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. ही कारवाई सहायक आयुक्त सु. आ. चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी कोळी, स्वामी व नमुना सहायक कवळे यांनी केली.