बामणोलीमध्ये हातभट्टी दारूअड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:28 IST2021-05-13T04:28:15+5:302021-05-13T04:28:15+5:30
कूपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील कोंडका मळ्यातील पत्र्याच्या मोकळ्या शेडमधील हातभट्टी दारूअड्ड्यावर कूपवाड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ...

बामणोलीमध्ये हातभट्टी दारूअड्ड्यावर छापा
कूपवाड : बामणोली (ता. मिरज) येथील कोंडका मळ्यातील पत्र्याच्या मोकळ्या शेडमधील हातभट्टी दारूअड्ड्यावर कूपवाड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी अड्ड्यावरील ५१ हजार १६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. रमेश भिकू रेपावत (वय ४९, रा. कोंडका मळा, बामणोली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बामणोली येथील कोंडका मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी संशयित रमेश रेपावत पसार झाला. पोलिसांनी दारूअड्ड्यावरील ५१ हजार १६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
शहरातील बजरंगनगरमध्ये हातभट्टी दारूची विक्री करीत असताना संशयित लक्ष्मण यशवंत जेठीथोर (४०, मूळ गाव हवेली, जि. पुणे, सध्या रा. बजरंगनगर, कूपवाड) यालाही कूपवाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळील २,५५० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.