प्राथमिक शिक्षकांना लवकरच पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:01+5:302021-03-08T04:25:01+5:30

फोटो ओळी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने नूतन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण गायकवाड, ...

Primary teachers promoted soon | प्राथमिक शिक्षकांना लवकरच पदोन्नती

प्राथमिक शिक्षकांना लवकरच पदोन्नती

फोटो ओळी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने नूतन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किरण गायकवाड, बाबासाहेब लाड, सयाजीराव पाटील, शशिकांत भागवत, सुनील गुरव उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : प्राथमिक शिक्षकांना लवकरच पदोन्नती देण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी शिक्षणाधिकारी विष्णू लोखंडे यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

प्राथमिक शिक्षक समितीचे नेते किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्डाचे सचिव शशिकांत भागवत, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव आदींनी शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांचे स्वागत केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे उपस्थित होते. यावेळी कांबळे म्हणाले की, पंचायत समितीकडे प्राथमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तपासणीकरिता पाठविली असून, ती तालुकास्तरावरून चार दिवसांत तपासणी करुन पाठवण्याची सूचना दिली आहे. सेवाज्येष्ठतेच्या निकषांवर शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात येईल तसेच उर्वरित प्रलंबित प्रश्नही सोडविणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे, कार्याध्यक्ष सतीश पाटील, शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष महादेव माळी, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, बाळासाहेब आडके, श्रेणिक चौगुले, सदाशिव पाटील, हरिभाऊ गावडे, रमेश पाटील, म. ज. पाटील, कांतेश सन्नोली, सयाजी बंडगर आदींसह शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Primary teachers promoted soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.