गुड्डापुरात पुजारी गटाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:19+5:302021-01-21T04:24:19+5:30
माडग्याळ : गुड्डापूर (ता़. जत) येथे भाजपप्रणित पुजारी गटाने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गुड्डापूर येथील ...

गुड्डापुरात पुजारी गटाची बाजी
माडग्याळ : गुड्डापूर (ता़. जत) येथे भाजपप्रणित पुजारी गटाने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले.
तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या गुड्डापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. येथे तीन प्रभागामध्ये नऊ जागांसाठी मतदान झाले. त्यात भाजपप्रणित आघाडीस ऩऊपैकी पाच जागा मिळाल्या. पूर्ण बहुमत मिळाल्याने सत्ता कायम ठेवण्यात पुजारी गटाने यश मिळविले, तर विरोधी काँग्रेस गटाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. तसेच श्रीसंत बाळुमामा ग्रामविकास पॅनेलचे दोन उमेदवार निवडून आले. मधुन बिरादार, कविता पुजारी, प्रसाद पुजारी, शोभा पुजारी, महादेवी सर्जे, बाळुमामा ग्रामविकास पॅनेलचे तुळसाबाई थोरात व बायक्का पाटील; तर काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष गऩी मुल्ला यांना दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यांचे गोपाल सर्जे व राजश्री पुजारी हे दोन उमेदवार ऩिवडून आले.