छायाताई पाटील यांच्यामुळे महिलांचा गौरव : नंदकुमार पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:26 IST2021-04-21T04:26:31+5:302021-04-21T04:26:31+5:30

ओळ : पोखर्णी (ता. वाळवा) येथे छायाताई पाटील यांचा सत्कार नंदकुमार पाटील, सुजाता पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ...

Pride of women due to Chhayatai Patil: Nandkumar Patil | छायाताई पाटील यांच्यामुळे महिलांचा गौरव : नंदकुमार पाटील

छायाताई पाटील यांच्यामुळे महिलांचा गौरव : नंदकुमार पाटील

ओळ : पोखर्णी (ता. वाळवा) येथे छायाताई पाटील यांचा सत्कार नंदकुमार पाटील, सुजाता पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी रंजना जाधव, उज्ज्वला बादरे उपस्थित होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : राष्ट्रवादी पक्ष हा महिलांना न्याय देणारा पक्ष आहे. छायाताई पाटील यांनी राजकारण, समाजकारण या माध्यमातून वाळवा तालुक्यातील महिलांचे प्रश्न सोडवले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील व पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी छायाताई पाटील यांना सन्मानाचे पद देऊन महिलांचा गौरव केला आहे, असे प्रतिपादन सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदकुमार पाटील यांनी केले.

पोखर्णी (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी छायाताई पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नंदकुमार पाटील बोलत होते. यावेळी वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुजाता पाटील, अनिल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, रंजना जाधव, उज्ज्वला बादरे, सविता पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या. सुजाता पाटील यांनी स्वागत केले. तर सविता पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Pride of women due to Chhayatai Patil: Nandkumar Patil