शिरशीत आशा स्वयंसेविकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:08+5:302021-08-27T04:29:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिरशी (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांनी कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल ...

Pride of Shirshit Asha Swayamsevak | शिरशीत आशा स्वयंसेविकांचा गौरव

शिरशीत आशा स्वयंसेविकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिरशी (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकांनी कोरोना काळात चांगले काम केल्याबद्दल शिराळा तालुका कामगार परिषदेमार्फत युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्याहस्ते त्यांना गौरविण्यात आले.

नाईक म्हणाले, कोराना विषाणू संसर्ग काळात आशा स्वयंसेविकांनी जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडली. घरोघरी पोहोचून तपासण्या करणे, माहिती गोळा करणे, आवश्यक काळजीबाबत उपाययोजना सांगण्याचे काम केले आहे. वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, बचत गट मदतनीस आदी यंत्रणांनी जबाबदारी पार पडल्याने कोरोनाला रोखू शकलो.

विलास पाटील यांनी स्वागत केले. मारुती रोकडे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच एम. बी. भोसले, उपसरपंच सर्जेराव भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम शिंदे, डॉ. शलाका थोरात, माजी पोलीस निरीक्षक बापूसाहेब जाधव, शंकर भोसले, महादेव रोकडे उपस्थित होते.

Web Title: Pride of Shirshit Asha Swayamsevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.