इस्लामपुरात आरोग्य सेविकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:15+5:302021-03-13T04:48:15+5:30
इस्लामपूर येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व आशा सेविकांचा सत्कार सुनीता सपकाळ, गणपत माळी यांच्या हस्ते करण्यात आला. ...

इस्लामपुरात आरोग्य सेविकांचा गौरव
इस्लामपूर येथे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व आशा सेविकांचा सत्कार सुनीता सपकाळ, गणपत माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. अशोक शेंडे, रोहित सपकाळ, संग्राम सपकाळ उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील प्रभाग क्रमांक १३ मधील नगर परिषदेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३५ आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविकांचा महिला दिनानिमित्त बांधकाम सभापती सुनीता सपकाळ यांच्या हस्ते बॅग देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात जिवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता, आरोग्य व आशा सेविकांनी दिलेली सेवा सदैव स्मरणात राहील, असे गौरवोद्गार सपकाळ यांनी काढले.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक शेंडे, शैलेश रजपूत, गणपत माळी, आनंदा माळी, सुनील माळी, सुनंदा मोरे, आश्विनी कुंभार, वैशाली पेठकर, रंजना माळी, दीपा माळी उपस्थित होत्या. रोहित सपकाळ, संग्राम सपकाळ यांनी संयोजन केले.