राजापुरी हळदीला १७ हजाराचा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST2021-03-13T04:50:16+5:302021-03-13T04:50:16+5:30
मटकीला चांगलाच भाव सांगली : सांगली मार्केट यार्डात शुक्रवारी झालेल्या सौद्यामध्ये मटकीला ११ हजार ८०० ते सहा हजार ५०० ...

राजापुरी हळदीला १७ हजाराचा दर
मटकीला चांगलाच भाव
सांगली : सांगली मार्केट यार्डात शुक्रवारी झालेल्या सौद्यामध्ये मटकीला ११ हजार ८०० ते सहा हजार ५०० रुपये दर मिळाला. सरासरी नऊ हजार १५० रुपये दर मिळाला आहे. आठ हजार ४५३ क्विंटल मटकीची आवक झाली होती. मटकीला चांगलाच भाव असल्यामुळे शेतकरी खूश झाला आहे.
गुळाला तेजी कधी येणार?
सांगली : येथील मार्केट यार्डात एक हजार १३० क्विंटल गुळाची आवक झाली होती. या गुळाला प्रति क्विंटल दोन हजार ८०० ते तीन हजार ४७५ रुपये दर मिळाला आहे. सरासरी तीन हजार १३८ रुपये दर मिळाला आहे. शुक्रवारअखेर चार लाख ७२ हजार ७८७ क्विंटल गुळाची आवक झाली आहे.
मिरचीचा भाव वाढला
सांगली : मार्केट यार्डात शुक्रवारी झालेल्या सौद्यामध्ये मिरचीला १५ हजार ५०० ते १४ हजार ५०० रुपये दर मिळाला आहे. सरासरी १५ हजार रुपये दर मिळाला आहे. आठ हजार ९१८ क्विटंल मिरचीची आवक झाली होती. मिरचीच्या दरात मागील आठवड्यापासून वाढच होत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.