युवा संघटनेचा अध्यक्ष अटकेत

By Admin | Updated: August 7, 2014 00:21 IST2014-08-06T23:40:49+5:302014-08-07T00:21:58+5:30

पिस्तुलासह जिवंत काडतुसे हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची मलकापुरात कारवाई

The president of the youth organization is arrested | युवा संघटनेचा अध्यक्ष अटकेत

युवा संघटनेचा अध्यक्ष अटकेत


कऱ्हाड : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पाटणमधील एका युवा संघटनेच्या अध्यक्षाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली़ सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने आज, बुधवारी सकाळी मलकापुरातील एका लॉजवर छापा टाकून ही कारवाई केली़ स्वत:ला युवा शक्तीचा अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या या आरोपीचे नाव उदय मारुती संकपाळ (वय ३९, रा़ सुरूल, ता़ पाटण) असे आहे़ दरम्यान, उदय संकपाळकडून पोलिसांनी ७़६५ बोअरचे पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत़

Web Title: The president of the youth organization is arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.