घोगावच्या दूध संस्थेतील अपहारप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्षांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:45+5:302021-09-02T04:57:45+5:30
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी, दि. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१३ या काळामध्ये आबाजी दूध संस्थेमध्ये ...

घोगावच्या दूध संस्थेतील अपहारप्रकरणी अध्यक्ष, उपाध्यक्षांना अटक
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी, दि. १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०१३ या काळामध्ये आबाजी दूध संस्थेमध्ये चार लाख ८१ हजार १५९ रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणाअंती सिद्ध झाले होते. लेखापरीक्षक जवाहर हिंदुराव पाटील यांनी ११ मे २०१९ रोजी संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील व उपाध्यक्ष जालिंदर जाधव यांच्यासह संचालक मोहन कृष्णा पाटील, अशोक विठ्ठल पाटील, अरुण राजाराम पाटील, चंद्रकांत भीमराव पाटील, कांचन गणपती पाटील, मीराबाई खाशाबा कांबळे, सचिव अनिल पाटील व मापाडी अतुल कांबळे यांच्यावर कुंडल पोलिसात आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांचा जामीन अर्ज फेटाळल्याने कुंडल पोलिसांनी अटक करून पलूस न्यायालयात हजर केले. त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.