कलाकार मानधन निवड समिती अध्यक्षपदी कडणे
By Admin | Updated: August 4, 2015 23:31 IST2015-08-04T23:31:58+5:302015-08-04T23:31:58+5:30
पालकमंत्र्यांची घोषणा : तीन वर्षांसाठी समिती नियुक्त

कलाकार मानधन निवड समिती अध्यक्षपदी कडणे
सांगली : जिल्ह्यातील कलाकारांना राज्य शासनाकडून दर महिन्याला मानधन दिले जाते. यासाठी कलाकारांकडून प्रस्ताव मागवून त्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर शासनाने समिती गठित केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी विजय कडणे यांची नियुक्ती केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन समितीची घोषणा केली आहे.राज्य शासनाकडून कलाकारांना तीन गटामध्ये मानधन दिले जाते. ‘अ’ गटातील कलाकारांमध्ये राष्ट्रीय पातळीवर बक्षीस मिळविलेल्या कलाकारांची निवड केली जाते. या कलाकारांना प्रति महिना एक हजार ४०० रुपये, तर ‘ब’ गटात राज्यस्तरावरील कलाकारांची निवड केली जाते. या कलाकारांना प्रति महिना बाराशे रुपये मानधन दिले जाते. ‘क’ गटामध्ये जिल्हास्तरावर नावलौकिक मिळविलेल्या कलाकारांची निवड केली जाते. या कलाकारांना महिना एक हजाराचे मानधन दिले जाते. या कलाकारांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर शासनाने समिती गठित केली आहे. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कलाकार मानधन वाढीबद्दल समिती गठित केली. या समितीच्या अध्यक्षपदी विजय कडणे, शफी नायकवडी, शाहीर देवानंद माळी, निशिकांत शेटे, नाट्य अभिनेते सर्जेराव गायकवाड, नाट्यकलाकार मुकुंद पटवर्धन, तमाशा व शाहिरी कलावंत विजया बुधगावकर, लेखक व साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांची निवड केली आहे. (प्रतिनिधी)