कोविड सेंटरमध्ये सध्या ६० रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:59+5:302021-02-05T07:29:59+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. सध्या चार कोविड सेंटरमध्ये ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ७० ...

कोविड सेंटरमध्ये सध्या ६० रुग्णांवर उपचार
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. सध्या चार कोविड सेंटरमध्ये ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ७० कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रविवारी दिवसभरात नवे ५ रुग्ण आढळून आले असून ११ जण कोरोनामुक्त झाले.
जुलै ते नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर होता. या काळात रुग्णांना बेडही मिळत नव्हते. पण डिसेंबरपासून रुग्णांची संख्या कमी होत आहे. जानेवारीत कोरोना साथ बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरात रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या मिरजेतील शासकीय कोविड रुग्णालयात ३५, भारती हाॅस्पिटलमध्ये १०, मिरज चेस्ट सेंटरमध्ये ८, सिनर्जी हाॅस्पिटलमध्ये ५, तर विटा येथील ओमश्री हाॅस्पिटलमध्ये २ असे ६० रुग्ण उपचाराखाली आहेत, तर ७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
रविवारी दिवसभरात नवे ५ रुग्ण आढळून आले, तर ११ जणांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सांगलीत दोन, तर आटपाडी, कडेगाव व जत तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. उपचाराखालील ३६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर २९, नाॅन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेंटरवर ५, तर हाय फ्लो नोझल ऑक्सिजनवर २ रुग्ण आहेत.