सांगली शहरात पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:24+5:302021-05-09T04:27:24+5:30
सांगली : शहर व परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे पावसानंतरही उकाड्याचा अनुभव नागरिक ...

सांगली शहरात पावसाची हजेरी
सांगली : शहर व परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे पावसानंतरही उकाड्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १० मेपासून वळवाचा पाऊस थांबणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज पावसाची हजेरी सुरू आहे. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाने गेल्या काही दिवसांपासून मुक्काम केला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. आता १० व ११ मे रोजी केवळ ढगाळ वातावरण व गडगडाट होणार असून, पावसाची शक्यता कमी आहे. १२ व १३ मे रोजी अंशत: ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे १० मेपासून वळवाचा पाऊस मुक्काम हलविण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तापमानही वाढत आहे. शनिवारी ढगाळ वातावरणात कमाल तापमान ३८, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. कमाल तापमान सरासरीच्या जवळ असून, किमान तापमान सरासरीपेक्षा दोन अंशाने अधिक आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे. येत्या सहा दिवसांत कमाल तापमानही ३९च्या घरात जाण्याची शक्यता आहे.