शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील आठवीच्या पोरानं शक्कल लढविली, फटाके उडविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल यंत्रणा बनविली

By संतोष भिसे | Updated: November 16, 2023 13:55 IST

ना भाजण्याची भीती किंवा फटाका पेटवून पळून जाण्याची धांदल

संतोष भिसेसांगली : दिवाळीत फटाके पेटविताना भाजल्याच्या बातम्या ठिकठिकाणांहून येतात. फटाके पेटविताना उरात होणारी धडधड सर्वांनीच कधी ना कधी अनुभवलेली असते. न जानो फटाका हातातच फुटायचा आणि पळायला वेळही मिळायचा नाही, अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते. सांगलीतील प्रेम पसारे या अवघ्या आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यालाही फटाक्यांची अशीच भीती वाटायची. त्यावर उपाय म्हणून त्याने फटाके पेटविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल तयार केला आहे.अवघ्या पाच-सहाशे रुपयांत तयार झालेली ही भन्नाट आयडियाची सुपीक कल्पना तमाम पालकांना दिलासा देणारी ठरली आहे. फटाक्याने पोराला भाजेल म्हणून पालक मोठ्या आवाजात फुटणारे फटाके देत नाहीत. फुलझडी, सुरसुरकाडी किंवा लसूण अशा छोट्या फटाक्यांवरच दिवाळी साजरी करतात. फटाक्यांमुळे भाजलेली अनेक मुले रुग्णालयात उपचार घेताना दिसतात. छोट्या प्रेमलादेखील फटाक्यांची अशीच भीती वाटायची. चहाटपरी चालविणारे वडीलही मोठे फटाके आणून द्यायचे नाहीत.यावर प्रेमने शक्कल लढविली. फटाके पेटविण्यासाठी चक्क रिमोट कंट्रोल यंत्रणा बनविली. सुमारे ३०० मीटर अंतरावरून रिमोटद्वारे फटाका पेटविता येतो. त्यामुळे भाजण्याची भीती राहत नाही किंवा फटाका पेटवून पळून जाण्याची धांदलही होत नाही.

दिवाळीत मोठ्या फटाक्यांचा आग्रह करणाऱ्या प्रेमला वडील नवनाथ यांनी त्याचे धोके सांगितले. फटाक्याने भाजल्याच्या काही घटना मोबाइलवर दाखविल्या; पण ऐकेल तो प्रेम कसला? त्याने रिमोट कंट्रोल बनवत वडिलांना निरुत्तर केले. त्यासाठी खेळण्याच्या गाडीतील रिमोट यंत्रणा वापरली आहे. अवघ्या आठवीच्या पोराची ही डोकॅलिटी सांगलीत चर्चेचा विषय ठरली आहे.

असा आहे रिमोटया यंत्रणेत उच्च ॲम्पियरचे दोन सेल बसविले आहेत. त्यातून वायरद्वारे विद्युत प्रवाह बाहेर काढून तांब्याच्या तारेला जोडला आहे. यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सेन्सर जोडला आहे. रिमोटचे बटण दाबताच सर्किट पूर्ण होते. सेलमधून विद्युत प्रवाह तांब्याच्या तारांमध्ये येतो. उच्च ॲम्पियरच्या विद्युत प्रवाहामुळे तारा गरम होतात. त्यावर वातीसह ठेवलेला फटाका धडाम करून फुटतो.

टॅग्स :Sangliसांगलीfire crackerफटाके