शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरींना किती मते मिळणार?; भविष्य सांगा अन् २१ लाख जिंका; अंनिसचे आव्हान

By संतोष भिसे | Updated: April 23, 2024 17:10 IST

आव्हान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना अंनिसने दिली प्रश्नावली

सांगली : कंगना राणावत, राहुल गांधी, नितीन गडकरी यांना किती मते मिळतील? याचे अचूक भविष्य सांगा आणि २१ लाख रूपये जिंका असे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिले आहे.अंनिसने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, देशभरात अनेक ज्योतिषी निकालांचे भाकीत वर्तवत असतात. राजकीय नेते त्यांच्या फसवणुकीला बळी पडतात. यातून अंधश्रद्धेला खतपाणी मिळते. या पार्श्वभूमीवर अंनिसने ही आव्हान प्रक्रिया राबविली आहे. डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायगणकर, प्रवीण देशमुख यांनी सांगितले की, लोकप्रबोधनाच्या हेतूने ही आव्हान प्रक्रिया राबविली जात आहे. उमेदवाराची जन्मकुंडली, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, राशीभविष्य, नाडी भविष्य, होरा शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धत, प्राणी पक्षी यांच्या वापराने वर्तविलेले भविष्य किंवा अर्ज भरताना काढलेला मुहूर्त, प्रचाराचा काढलेला मुहूर्त, उमेदवाराच्या नावातील अद्याक्षरे यापैकी कशाच्या आधारे भविष्य वर्तविले हे ज्योतिषाने स्पष्ट करायचे आहे.आव्हान प्रक्रियेत सहभागासाठी प्रवेशिका, उत्तरासहित प्रश्नावली आणि 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती, महाराष्ट्र' या नावे काढलेला ५००० रुपयांचा  धनाकर्ष (डीडी) २५ पर्यंत कार्तिक अपार्टमेंट, एफ ४, सहारा चौक, संजयनगर, सांगली या पत्त्यावर पाठवायचा आहे. लोकसभेचे सर्व निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाल्यावर दोन आठवड्यांत परीक्षक समिती ज्योतिषाचा निकाल जाहीर कोल.

अंनिसची प्रश्नावलीआव्हान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ज्योतिषांना अंनिसने दिलेली प्रश्नावली अशी : टी. शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मलहोत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील ? कोलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी येथे कोण विजयी होईल ? वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर येथे सगळ्यात कमी मते कोणाला पडतील ? संपूर्ण भारतात सर्वात कमी मते कोणाला मिळतील ? कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल ? पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल ?

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४